मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

ग्राहक म्हणतात

डॉ. ऋजुता विनोद - anusandhan.org.in

Dr Rujuta Vinod२००० पासून आमच्य़ा तीन वेबसाईट्स अस्तित्वात होत्या. त्यावेळी प्रचलित असलेली सॉफ्टवेअर वापरून त्या केलेल्या होत्या. मजकुरात बदल करणं मला तेव्हढ सोपं नव्हतं. त्यामुळे त्या ताज्या राहिल्या नव्हत्या. आमचं काम पुढील वर्षांत खूप झालं होतं. या सर्व वेबसाईट्सची कात टाकून त्या प्रसन्न कराव्यात असं वाटत होतं. २००४ ते २००८ पर्यंत दुसर्‍याला काम देण्याचेही माझे निष्फळ प्रयत्न करुन झाले होते.

एप्रिल २००८ मध्ये प्रसाद व माझी बर्‍याच वर्षांनी गांठ पडली. श्री. प्रसाद शिरगांवकर संस्थेचे माजी विद्यार्थी. हे अतिशय बुध्दिमान, हसरं व्यक्तिमत्व, हळुवार शायराचं मन, तरीही यशस्वी शैक्षणिक व व्यावसायिक नावलौकिक असलेले. देशात व परदेशांत उत्तम कामाचा अनुभव असलेले. "महर्षि विनोदांची वेबसाईट पुनरुज्जिवित करू या", असं मी म्हणल्यावर ते म्हणाले, "अहो मी अशा प्रकारचं म्हणजे मराठी वेबसाईट्स करण्याचं काम करतो. “. माझा आनंद गगनात माईना!

मग आम्ही मीटिंगची वेळ ठरवली. ते मुद्दे काढून जय्यत तयारीनं आले होते. त्यांनी काही मोजक्या पण महत्वाच्या मुद्यांवर मला विचार करायला सांगितला. आवाजात पूर्वीसारखाच गोडवा, विचार करत अंदाज घेतघेत शब्द देण्याची त्यांची सवय.

वेबसाईट तयार करण्याच्या तांत्रिक जगापासून तोपर्यंत मी लांब गेले होते. पाटी कोरी करुन मी नव्यानं काम करायला सुरुवात केली. वेबसाईटमधून मला काय वाचकांपर्यंत पोचवायचय? माझे हेतू काय आहेत? इथपासून ते ले आऊट, टेंप्लेटचे सिलेक्शन, त्यांच्या सॉफ्टवेअरची संरचना, विविध फायदे इ. मी त्यांच्याकडून समजून घेत गेले.

साईट ताजी करताना नवीन बरंच शिकावं लागणार हे मला दिसलं. मला जुलै २००८ च्या गुरुपौर्णिमेची वेळ महर्षी विनोदांवरच्या वेबसाईटच्या प्रकाशनाकरीता गाठायची होती. हातात अडीच महिने होते आणि हजारो पानं, प्रतिमा साईटवर घालायच्या होत्या. अक्षरशः सतीची वाण घेतलं होतं. प्रसादच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी निश्चिंत होते.

"बरहा" हे मोफत सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं, युनिकोडमध्ये टाईप करायला शिकणं, आधीच्या श्रीलिपीमधल्या मराठी फाईल्सचं "रुपांतर" या नावाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं युनिकोडमध्ये करणं, निवडलेल्या प्रतिमा गुगल-पिकासा वेब-अल्बम मध्ये टाकून त्याचे एचटीएमएल लिंक्स वेबसाईटमध्ये देणं, बुकपेज तयार करणं, त्याचं नेविगेशन करणं, इव्हेंट तयार करायला शिकणं इ. अनेक गोष्टी मी प्रसादकडून शिकले. ग्राहकाची गरज, मेहनत घेण्याची तयारी, शिकण्याची तयारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे लवचिकता प्रसाद ठेवतात व ग्राहकाला संपूर्ण समाधान मिळेल असं ते पहातात.

२००८ च्या व्यासपौर्णिमेला आमच्या "महर्षि विनोद" या वेबसाईटचं प्रकाशन झालं, प्रसादनं स्वतः जातीनं येऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांची भूमिका नम्र होती. आमच्या या साईटची १८०० पाने झाली आहेत. नंतर "पातंजल योगा"च्या साईटचे काम हाती घेतलं तेही काम काही महिन्यात पूर्ण झालं. ह्या दोन्ही साईट्समध्ये इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत मजकूर घातलेला आहे.

या यशस्वी अनुभवानंतर मी २००९ मध्ये माझ्या "स्वीकृती सेंटर"च्या वेबसाईटचं काम हाती घेतलं. मात्र त्या द्विभाषिक न करता इंग्रजी व मराठी अशा दोन वेगळ्या एकभाषिक साईट्स केल्या. खर्च आला पण मराठी व अमराठी भाषिकांकरीता ते सोपं जाईल असं वाटलं.

२००९ च्या दिवाळीत मी माझी पाचवी वेबसाईट "अनुसंधान" प्रकाशित केली. ती १००० हून जास्त पानी झाली आहे व २००० पानी होऊ शकेल अशी आहे. या कामात प्रसादच्या नवीन सहाय्यिका श्वेता, पल्लवी आणि नीलम यांची खूप मदत झाली.

या सर्व साईट्समध्ये मी श्वेताकडून एडिटर टाकून घेतला. त्यामुळे साधे फॉर्मेटिंग करणे सोपे गेले. मग मी होमपेज सतत ताजे ठेवण्याच्या दृष्टीने नोडक्यू नावाचे काम प्रसादकडून शिकून घेतले. सर्च टॅग टाकल्याने व साईट्स ऑप्टिमाईज केल्याने जास्तीत जास्त नेटिझन्सपर्यंत आम्हाला पोचता आले. गुगल ऍनालिटिक्स, वेबमास्टर यावर आपल्या साईट्सचा परफॉर्मन्स पहायलाही प्रसादने शिकवले. त्यांच्याकडून साईट मॅप करवून घेणे आव्हानाचे होते.

माझ्या सर्व साईटस्‌मध्ये मिळून ६ गुगल कॅलेंडर्स्‌ टाकली आहेत. त्यामुळे वाचकांना आपले दैनंदिन काम व कुळाचार/उत्सव/यात्रा यांची सांगड घालता येते. वेबपेजेसच्या लिंक्स फ़ेसबुक, ट्विटर, बज, फ़्लिकर, ब्लॉग या ठिकाणी share करण्यासाठी बटन्सही नुकतीच टाकली आहेत. त्यामुळे एखादे पान आवडले तर वाचकाला ते इतरांबरोबर शेअर करता येते.

२०१० गुरुपौर्णिमेला मध्ये मी "आनंदाचे डोही" ही माझी सहावी वेबसाईट प्रकाशित केली. त्यामध्ये आत्तापर्यंत न केलेले काम म्हणजे इ-बुक्स पी.डी.एफ्‍. मध्ये तयार करणे, बुक कव्हर इमेज देणे, पुस्तकाचा सारांश देणे इ प्रसादच्या मार्गदर्शनाखाली केले. आत्तापर्यंत दीड वर्षात पन्नासच्या वर इ-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या वेबसाईटचे काम श्रीनिवासने केले. लोगोही त्यानेच निवडला. टॅग वेगळ्या प्रकारे तयार करण्यात त्याची मदत झाली.

नुकतीच अजून एक interactive website करण्याविषयी प्रसादशी बोलणे झाले आहे. नवीन कल्पना उचलून धरणे, ती कितपत्‌ व्यवहार्य आहे हे पहाणे, तिचा आवाका लक्षात घेणे व नवीन प्रयोग करायचा उत्साह असणे या प्रसादच्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत.

मी कितीही बदल सुचवले तरी प्रसाद वास्तवाचं भान ठेवून व सर्वंकष विचार करुन सल्ला देतात, यात मला प्रसादची परिपक्वता दिसते. त्यांचे आता काम खूप वाढले आहे. परदेशातूनही त्यांना खूप काम मिळाले आहे. दोन ऑफिसे झाली आहेत. माणूसबळ वाढलं आहे. या सर्वांमध्ये मला एक वर्ककल्चर दिसतेय - सुसंवाद, गोडवा, शांति, संयम, कामाची गुणवत्ता, ग्राहकाच्या व्यक्तिमत्वाची व त्याच्या अपेक्षांची जाण, काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करणं.

या दीड वर्षांत माझी कोणाशीही एकदाही वादावादी झाली नाही, आमचे पैशावरुन गैरसमज झाले नाहीत. फार कमी वेळात केवढे तरी काम झाले. याचे मलाच आश्चर्य वाटते कधीकधी!

माझ्यातल्या लेखिकेला वेबवरून वाचकांशी संवाद साधता येतो याचं खूप समाधान आहे.

प्रसाद व त्यांच्या टीमच्या या आव्हानात्मक कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

www.marathigazal.com

marathigazal.com

www.sadha-sopa.com

sadha-sopa.com

www.maharshivinod.org

maharshivinod.org