मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

मराठीत वेबसाईट कशासाठी?

phul1
तुमची वेबसाईट मराठी भाषेमध्ये का असायला हवी ?

  • तुमचे ग्राहक अथवा वाचक प्रामुख्याने मराठी भाषिक असतील किंवा
  • तुमचे साहित्य प्रामुख्याने मराठीमध्ये असेल किंवा
  • तुम्हाला जे प्रकाशित करायचे आहे ते मराठीमध्ये प्रकाशित करणे आवश्यक असेल

तर तुमची वेबसाईट मराठीमध्येच असायला हवी!

कोण त्या प्रकारच्या वेबसाईटस मराठी मध्ये करता येतात किंवा कराव्यात?

खरंतर कोणत्याही प्रकारची वेबसाईट मराठी मध्ये तयार करणं शक्य आहे.वेबसाईटसारख्या आधुनिक माध्यमाचे अगणित उपयोग आहेत. अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी वेबसाईट तयार करून इंटरनेटच्या व्यापक तरिही संवादी स्वरूपाचा
आपल्या कामासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. वेबसाईट्स करण्यामागचे काही प्रमुख हेतू असे :

  • तुमची, तुमच्या कामाची, संस्थेची, कंपनीची, व्यवसायाची, उत्पादनांची, सेवांची माहिती देणाऱ्या
  • तुमच्या वाचकांकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती, प्रतिसाद,प्रतिक्रिया, अभिप्राय गोळा करणाऱ्या
  • विविध विषयांवरचे चर्चागट अथवा व्यासपीठं निर्माण करून मुक्त चर्चा चालवणाऱ्या
  • आपल्या कथा, कविता, लेख, चित्र, एकांकिका, गीतं असं कोणत्याही प्रकारचं साहित्य प्रकाशित करणाऱ्या आणि त्यावर वाचकांचे अभिप्राय घेणाऱ्या
  • कार्यकर्त्यांची जाळे बांधणाऱ्या, त्यांना सहकाराने एकत्र काम करण्यास आवश्यक सुविधा देणाऱ्या आणि आपल्या कार्यक्रम / उपक्रमांची माहिती प्रकाशित करणाऱ्या
  • आपल्या नियतकालिक / वार्तापत्राची ई-आवृत्ती चालवणाऱ्या अथवा नवी वैशिष्ट्यपूर्ण ई-नियतकालिकं प्रकाशित करणाऱ्या
  • आपल्या उत्पादनांची अथवा सेवांची विक्री करणाऱ्या

www.marathigazal.com

marathigazal.com

www.sadha-sopa.com

sadha-sopa.com

www.maharshivinod.org

maharshivinod.org