मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

अत्याधुनिक वेबसाईट्स मध्ये कोणत्या सोयी असायला हव्यात?

काही वर्षांपूर्वी अगदी साधी वेबसाईट मराठीमध्ये तयार करणं आणि ती वाचकांना उपलब्ध करून देण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागायची, बराच खर्च यायचा. हा सगळा उपद्व्याप करूनही आपली साईट सर्व वाचकांना नीट दिसेलच याची खात्री नसायची. या शिवाय आपल्या साईटवर काहीही बदल करण्यासाठी किंवा सतत नवं सहित्य प्रकाशित करण्यासाठी विशेष तांत्रिक माहिती शिकण्याची किंवा काही तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची गरज असायची. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. मुक्तस्रोत तंत्रज्ञान (open source technology), युनिकोड फॉंट्स, साहित्य व्यवस्थापन प्रणाली (content management systems) इत्यादी प्रगतीशील बदलांमुळे नव्या युगाच्या दमदार वेबसाईट्स तयार करणं आणि त्यावर नवं साहित्य / माहिती प्रकाशित करणं हे खूप सोपं झालं आहे.

अत्याधुनिक वेबसाईट्स बर्‍याच नव्या सोयी सुविधा करता येतात

  • आपल्याला हवे ते साहित्य आपण स्वतः प्रकाशित करण्याची सोय (कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय आणि Website Developer च्या मदतीशिवाय!)
  • आपण प्रकाशित केलेल्या साहित्य / माहितीवर वाचकांची मतं,प्रतिक्रिया, प्रतिसाद घेण्याची सोय
  • आपल्या आगामी कार्यक्रमांची माहिती व त्याचे कॅलेंडर, तसेच मागील कार्यक्रमांची सूची व माहिती देण्याची सोय
  • साईटवर चर्चागट स्थापन करून उपयुक्त विषयांवर ऑनलाईन चर्चा घडवून आणण्याची सोय
  • आपल्या कार्यक्रमाच्या, भाषणांच्या, माहितीच्या अथवा इतर कुठल्याही चित्रफिती (Videos) प्रकाशित करण्याची सुविधा
  • नियतकालिक (Newsletter) प्रकाशित करून ते ईमेलद्वारे वितरित करण्याची सोय
  • गूगल अथवा इतर सर्च इंजिन्स वर केलेल्या शोधामध्ये आपली साईट सापडण्याची सोय
  • साईटवरून वस्तू अथवा सेवा विकता येण्याची सोय (ई-कॉमर्स) आपली जालनिशी (blog) लिहिता येण्याची सोय

अर्थातच अशा सर्व सोयी आम्ही आपल्याला आपल्या मराठी वेबसाईटमध्ये करून देऊ शकतो!